Friday, July 26, 2013

शेतक-याच्या मुलीचा विवाह झाल्यावर ती शेतकरी ठरत नाही ? अलिबाग तहसिलदारांच्या अजब फतव्याने शेतकरी त्रस्त

अलिबाग - मुलीचा विवाह झाल्यावरही तिचा वडीलांच्या मालमत्तेमध्ये व जमिनजुमल्यामध्ये हिस्सा असतो असा कायदा आहे, परंतु या कायदयाचा विसर तहसिलदार पदावर काम करणा-या जबादार सरकारी अधिका-यालाच पडत असेल तर महिलांनी जायचे कोठे असा प्रश्न अलिबाग तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते व काॅंग्रेसचे पदाधिकारी मच्छींद्र पाटील यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकामध्ये केला आहे. याबाबत माहिती देताना पाटील यांनी सांगितले की, त्यांच्या नातेवाईक सारळ दत्तपाडा येथील रसिका संतोष पाटील यांनी त्यांचे वडील शेतकरी असल्याने त्यांना शेतकरी असल्याचा दाखला मिळावा असा असा अर्ज तहसिलदार अलिबाग यांचेकडे दि. 14 जून रोजी केला होता केला होता. हा अर्ज करतेवेळी रसिका यांनी त्यांचा विवाह झाला असल्याचे स्पष्टपणे नमूद करून त्यांचे पुर्वाश्रमीचे नाव रसिका रामकृष्ण म्हात्रे असून त्यांचे वडील रामकृष्ण रघुनाथ म्हात्रे यांची कावाडे ता.अलिबाग येथे शेतजमिन असल्याची माहितीही तहसिल कार्यालयास दिली होती. तहसिलदार अलिबाग यांनी सदरचा अर्ज तलाठी सजा सारळ यांचेकडे पाठविल्यावर तलाठी यांनी तहसिलदार यांचेकडे अहवाल सादर करून रसिका यांचा विवाह झाला असला तरी त्यांचे वडील रामकृष्ण रघुनाथ म्हात्रे यांची कावाडे ता.अलिबाग येथे शेतजमिन आहे व रसिका या जमिनीमध्ये वारसदार असल्याने त्यांना शेतकरी असल्याचा दाखला देण्यास हरकत नाही अशी शिफारस तहलिसदार यांना केली होती. म्हाराष्ट् शासनाच्या नागरिकांची सनद या माहितीपत्रकामध्ये शेतकरी दाखला अर्ज केल्यापासनू फक्त 3 दिवसांत देण्याचा आहे प्रत्यक्षात तहसिलदार यांनी रसिका पाटील यांनी अर्ज केल्यावर एक महिन्याने त्यांच्या प्रकरणात रसिका पाटील यांनी एकत्रित राहून शेती करीत असल्याचे पुरावे दयावेत असे त्यांना फर्माविले ! व तसे आदेश पुन्हा तलाठी यांना देण्यांत आले ! तहसिलदारांच्या या कृतिने रसिका पाटील मात्र अचंबित झाल्या कारण त्यांचा विवाह झाला असल्याचे त्यांनी त्यांच्या अर्जात स्पष्टपणे नमूद केले होते, त्यामुळे आता त्या त्यांच्या पतीकडे रहात असल्याने त्या वडीलांसमवेत एकत्रित राहून शेती करीत असल्याचा पुरावा कसा देणार? असा यक्षप्रश्न त्यांच्या समोर उभा राहीला आहे. त्याच सोबत विवाह झाल्यावर शेतक-याची मुलगी शेतकरी या संज्ञेत बसत नाही का? असाही प्रश्न उपस्थित होत आहे. किंबहुना जर असे असेल तर भावासोबतच बहिणींनाही समान हक्क देण्याच्या राज्य मंत्रिमंडळाच्या निर्णयाचा माहिलांना फायदा तो काय मिळणार? तसेच रसिका यांचे वडीलांनी सत्यप्रतिज्ञापत्र तहसिलदार यांच्याकडे सादर केले असल्याने रसिका या त्यांच्या अधिकृत वारस असल्याचे सिध्द होत होते. असे असतानाही शेतक-याला शेतकरी असल्याचा दाखला मिळण्यासाठी एवढी वणवण करायला लावणारे महसूल विभागाचे अधिकारी बडया धेंडयासांठी काय काय प्रकार करतात व कसा रात्रीचा दिवस करतात हे अलिकडेच महसूल विभाागात उघडीस आलेल्या ‘धाडसत्राने’ सिध्द झाले आहे अशी सणसणीत टिका मच्छींद्र पाटील यांनी केली आहे. स्यिांसाठी बरेच कायदे झाले, होत आहेत. स्त्रीला तिचा न्याय हक्क मिळावा, संरक्षण मिळावे, मानाचे स्थान मिळावे म्हणून, स्त्री आर्थिकदृष्टया सबल व्हावी, जन्माच्या पूर्वीपासून तिला संरक्षण मिळावे, तिला योग्य शिक्षणही मिळावे यासाठी विविध योजना पुढे येत आहेत. पण हे सारे कायदे उपाययोजना ख-या अर्थाने राबविल्या जाण्यासाठी सरकारी अधिका-यांची सकारात्मक दृष्टी महत्वाची आहे, अलिबागच्या तहसिलदारांसारखे आणखी काही अधिकारी निपजले तर वडिलोपार्जित मालमत्तेत मुलींना, बहिणींना हक्क देण्याचा कायदा असला, तरी प्रत्यक्ष व्यवहारात मुलींचे हक्क कागदोपत्रीच रहाणार असल्याचे सामाजिक कार्यकर्ते मच्छींद्र पाटील यांनी शेवटी नमूद केले आहे

Saturday, March 9, 2013

अलिबाग काग्रेस कमिटी

महिलादिनी अलिबाग काग्रेसतर्फे ‘राणी लक्ष्माबाई’ सामाजीक पुरस्काराचे उत्साहात वितरण! महिलांच्या गर्दीने काग्रेसभूवन गेले ओसंडून! अलिबाग - जागतिक महिलादिनानिमीत्त समाजातील तळागाळातील महिलांना ‘राणी लक्ष्मीबाई सामाजिक पुरस्कार देवून अलिबाग काॅंग्रेस कमिटीने काॅंग्रेस पक्षाचे लक्ष समाजातील षेवटच्या घटकापर्यंत असल्याचे सिध्द केले असल्याचे प्रतिपादन माजी आमदार मधुकर ठाकूर यंानी आज काॅंग्रेस भूवन येथे केले. राज्यात व के्रद्रात काॅंग्रेस आघाडीचे सरकार कार्यरत असल्याने काॅंग्रेस अध्यक्षा सोनियाजी गांधी यांच्या महिलांप्रती असणा-या आस्थेचे प्रतिबींब षासनाच्या प्रत्येक निर्णयामध्ये ज्याप्रमाणे दिसून येते आजच्या महिला दिन कार्यक्रमामध्ये अलिबाग तालुक्यांतील कश्टकरी महिलांना राणी लक्ष्मीबाई सामाजिक पुरस्कार देवून गौरविल्याने काॅंग्रेस पक्ष नेहमी महिला सबलीकरणासाठी प्रयत्नषिल राहणार असल्याचे प्रतित झाले असल्याचे ठाकूर यांनी सांगितले. पुरस्कारप्राप्त महिला समाजतील तळागाळातील असून आजपर्यंत कोणत्याही पुरस्काराची अपेक्षा न ठेवता त्यांनी आपापली कौटूंबीक व सामाजिक जबाबदारी निभावली आहे या महिलांनी कौटूंबीक जबाबदारी पार पाडत असतानाच अप्रत्यक्षपणे सामाजिक सेवाही असल्याने लौकीकार्थाने त्या पुरस्कारास पात्र ठरल्या आहेत. या प्रसंगी दुस-यांकडे घरकाम करून करून आपली कौटंूबिक व सामाजीक जबादारी पार पाडलेल्या षुभांगी अषोक बांबरकर, वकील न नेमता धाडसाने कोकण आयुक्तंापुढे आपली बाजू मांडणा-या दिपीका दयानंद थळे, स्वयंरोजगारा व्दारे बचतगटांसाठी काम करणा-या.रूपाली विजय थळे, जिल्हा रूग्णालयातील चतुर्थ श्रेणी कर्मचारी कमल बबन महाडीक, ग्रामीण भागातील महिलांना व्यवसायाच्या संधी उपलब्ध करून देणा-या रतन सगंम पाटील पुरस्कार देवून गौरविण्यात आले. या प्रसंगी कु. सोनल दिपक ढमाले या 8 वी मधील विदयार्थीनीने धाडस करून छेडछाड करणा-यांना अद्दल घडविल्याबद्दल तिला राणी लक्ष्मीबाई पुरस्कार प्रोत्साहनपर रूपात देण्यांत आला. स्वतःच्या षाळेसमोर काही मुले नेहमी घोळका करून उभे राहून मुलींची छेड काढीत असल्याचे पाहून ही घटना स्वतःच्या पालकांना सांगितली. एवढेच करून सोनल थांबली नाही तर ती पालकांना घेवून सरळ पोलीस ठाण्यांत व षाळेच्या मुख्याध्यापकांकडे गेली. या चिमुरडीचे धाडस पाहन पोलीस अधिकारीही चकीत झाले व त्यांनी अलिबाग षहरामधील षाळांजवळ पोलीस बंदोबस्त वाढविला त्यामुळे मुलींच्या षाळांजवळ कामाषिवाय रंेगाळणारी मुले दिषेनाषी झालंी असून मुलींचा पालकवर्ग सोनलला धन्यवाद देत आहेत. अषा या धाडसी कु. सोनल दिपक ढमाले हिला आज महिला दिनी प्रोत्साहनपर राणी लक्ष्मीबाई सामाजिक पुरस्कार देवुून तिचा गौरव करण्यांत येत आहे. या वेळी तालुका अंगणवाडी निवडसमिती पदी अध्यक्ष म्हणून निवड झाल्याबद्दल पद्मजा पाटील यंाचा सत्कार करण्यांत आला. कांॅग्रेसतर्फे वेगवेगळया निवडणूका लढविणा-या श्रीमती वारंगे, जयश्री गावडे, संजुक्ता अनुभवणे, मनिशा नंादगावकर, सरोज डाकी, मंदाताई बळी,मोनिका पाटील, या कार्यक्रमास प्रदेष काॅंग्रेसचे निरीखक इब्राहिम दलवाई विषेश अतिथी म्हणून उपस्थित होते. दलवाई यांनी उपस्थितांना संबोधीत करताना त्यांची अलिबागची आजची दुसरी भेट असून काॅंग्रेस पक्षाच्या कार्यकत्र्यांचा येथील उत्साह नोंद घेण्यासारख असून मधुकर ठाकूर आमदार नाहीत हे कोणास सांगूनही खरे वाटणार नाही. अषाच उत्साहाने काॅंग्रेसच्या सर्व कार्यकत्र्यांनी कार्यरत रहावे असे आवाहन दलवाई यांनी केले. महिला काॅंग्रेसच्या जिल्हा अध्यक्षा वासंती उमरोटकर, माजी जि.प.सदस्या रविना ठाकूर,जिल्हा उपाध्यक्ष म.हि.पाटील व तालुकाध्यक्ष अनंत गोंधळी यांनीही उपस्थितांना संबोधीत केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक षहर अध्यक्षा अॅड.श्रध्दा ठाकूर, सुत्र संचालन एस.एम.पाटील व आभार प्रदर्षन तालुकाध्यक्षा मिनाक्षी खरसांबळे यानी केले.

Friday, July 6, 2012

Amdar jayant patil ibn lokmat speed boat scam 2012-07-06

Thursday, July 5, 2012

jayant patil amdar alibag speed boat scam zee news