

msthakurexmla.blogspot.com


खानाव ग्रामपंचायतीमध्ये का>ग्रेसची हॅट्ीक ! सरपंचपदी जितेंद्र गोंधळी
तर उपसरपंचपदी रूपाली थळे यांची बिनविरोध निवड.
अलिबाग.- राजकीय पक्षांनी प्रतिष्ठेची केलेल्या अलिबाग तालुक्यातील खानाव
ग्रामपंचायतीवर काॅंग्रेसने निर्विदाद यश मिळविले होते. त्यामुळे
अपेक्षीत केल्याप्रमाणे आज झालेल्या सरपंचपदाच्या निवडणूकीत सरपंचपदी
काॅंग्रेसचे जितेंद्र अनंत गोंधळी व उपसरपंचपदी रूपाली योगेश थळे यांची
बिनविरोध निवड करण्यांत आली. जितेंद्र अनंत गोंधळी व रूपाली योगेश थळे
यांचे अनुक्रमे सरपंच व उपसरपंचपदासाठी एकमेव अर्ज दाखल झाल्याने अध्यासी
अधिकारी श्रीमती घुगे यांनी दोन्ही उमेदवार बिनविरोध निवडून आल्याचे
जाहीर करताच उपस्थित काॅंग्रेस कार्यकत्र्यांनी एकच जल्लोष केला.
विजयी उमेदवारांचा सत्कार करण्यासाठी काॅंग्रेस नेते माजी आमदार मधुकर
ठाकूर स्वतः जातीने उपस्थित होते. ठाकूर यांन यावेळी बोलताना काॅंग्रेसचे
तालुकाध्यक्ष अनंत गोंधळी यांचे विशेष अभिनंदन केले. खानावच्या सर्वच्या
सर्व जागा जिंकण्याच्या बाता मारणा-यांचे दात गोंधळींनी त्यांच्याच घशात
असे काही घातले आहेत की आता पुन्हा खानावकडे वळून पहाण्याची या
बढाईखोरांची हिंमत होणार नाही. खानाव मध्ये भ्रष्टाचार झाल्याच्या बोंबा
मारणारे जिल्हा परिषद व पंचायत समिती त्यांच्याकडेच असल्याची सोयिस्कर
विसरत असल्याचे जनतेच्या तेव्हाच लक्षात आले होते. त्यामुळे काॅंग्रेसने
येथील विकासकामांना दिलेली ही पावती असून आता खानावमध्ये यापेक्षा वेगाने
विकासकामे करण्यांत येतील असेही ठाकूर यंानी जाहिर केले.
यावेळी जिल्हा उपाध्यक्ष म.हि.पाटील, तालुकाध्यक्ष अनंत गोंधळी, निवडणूक
प्रभारी योगेश मगर, जिल्हा समिती सदस्या सरोज डाकी, मोनिका पाटील, शहर
महिला अध्यक्षा अॅड.श्रध्दा ठाकूर, बामणगांव सरपंच बाळू वरसोलकर, कृष्णा
भोपी, श्रीकांत नाईक, प्रभाकर राणे, सुरेश म्हात्रे, अॅड.महेश ठाकूर,
इ.उपस्थित होते.
-page-001.jpg)
-page-002.jpg)
-page-004.jpg)
-page-005.jpg)


अलिबाग - आ.जयंत पाटलांनी प्रथम प्रा.एन.डी.पाटील त्यांच्या मुसक्या बांधण्याची मागणी करीत आहेत त्याकडे पहावे, मग काॅंग्रेस-राष्ट्वादी आघाडीबाबत बोलावे अशी परखड टिका काॅंग्रेसचे माजी आमदार मधुकर ठाकूर यांनी केली आहे. शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रा. एन. डी. पाटील यांनी नुकत्याच संपलेल्या विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनामध्ये पाच दिवसांपूर्वी म्हणजे 31 जुलै रोजी विधानभवनाच्या पायर्यांवर राज्य शिखर बॅकेच्या विरोधात धरणे धरले होते त्यावेळी त्यांनी राज्य सहकारी बॅंकेच्या संचालकांच्या मुसक्या बांधा अशी मागणी केली होती त्याचाच संदर्भ देताना आ.जयंत पाटील व आ.मिनाक्षी पाटील हे दोघेही राज्य शिखर बॅंकेच्या बरखास्त संचालक मंडळापैकी संचालक असल्याने आ.जयंत पाटील यांनी त्यांच्या पक्षाचा जेष्ठ नेता त्यांच्याच मुसक्या बांधण्याची मागणी का करीत आहे त्याचे प्रथम उत्तर दयावे अशी मागणी केली आहे सहकार कायद्याच्या कलम 83 व कलम 88 नुसार राज्य शिखर बॅंकेच्या बरखास्त संचालक मंडळाला नोटीसा बजाविण्यात आल्याचे सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी याच अधिवेशनामध्ये स्पष्ट केले असल्याने राज्य शिखर बॅंकेच्या माध्यमातून स्वतःच्या मुलाच्या कंपनीसाठी सुमारे 25 कोटींची बॅंकगॅंरटी घेणा-या आ.जयंत पाटीलांसह इतर सर्व संचालकांविरूध्द न्यायालयात फौजदारी खटला सुरू असल्याची माहितीही ठाकूर यांनी यावेळी दिली. त्याबरोबर ठाकूर यांनी प्रा.एन.डी.पाटलांसारखा आपल्या पक्षाचा जेष्ठ नेता विधानभवनाच्या पायर्यांवर धरणे धरावयास बसला त्यावेळी शेकापचा एकही आमदार त्यांची साधी विचारपूस करावयास गेला नाही उलट त्यादिवशी सायंकाळी विधानसभाध्यक्ष दिलीप वळसे-पाटील आणि संसदीय कामकाजमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी मध्यस्थी केल्याने त्यांनी धरणे मागे घेतले.
आ.जयंत पाटील यांचा शेकाप फक्त रायगडमधील चार तालुक्यांपुरताच असल्याची घणाघाती टिका करताना ठाकूर यांनी आ.जयंत पाटील तावातावाने शेकाप कधीही स्वतंत्र विदर्भाला पाठींबा देणार नाही सांगतात तर त्याच वेळी विदर्भातील शेकापचे जेष्ठ नेते माजी खासदार भाई केशवराव धोेंडगे यांनी स्वतंत्र तेलंगणाच्या धर्तीवर वेगळया विदर्भाची मागणी केली आहे. त्यामुळे शेकापचे सरचिटणीस असलेले आ.जयंत पाटील चांगलेच तोंडावर आपटले असून त्यांचा त्यांच्या पक्षात वकुब नाही त्यांनी काॅंग्रेस आघाडी काय करते आहे त्याची उठाठेव करण्यापेक्षा स्वपक्षावरच आधि नियंत्रण प्रस्थापीत करावे असा सल्लाही ठाकूर यांनी आ.जयंत पाटील यांना दिला आहे.