Saturday, November 16, 2019

जेएसडब्ल्यूच्या प्रदूषणाने जनता हैराण, पर्यावरण विभागाच्या पूर्वअटीनुसार कंपनीने झाडांची लागवड केली नसल्याने प्रदुषणाचा त्रास. वडखळ येथील सामाजिक कार्यकर्ते मनोहर पाटील यांचा आरोप. https://alibagreporter.business.site/ पेण - तालुक्यातील डोलवी येथील जेएसडब्ल्यू स्टील लि. कंपनीच्या प्रदूषणाने परिसरातील अनेक गावांना विळखा घातलेला आहे. त्यामुळे येथील नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला विविध प्रकारच्या श्वसनाच्या आजारांना त्यांना तोंड द्यावे लागत आहे. कंपनीला पर्यावरण परवानगी देताना परिसरातील प्रदुषण कमी होण्यासाठी काही एकर क्षेत्रावर वृक्षारोपण करण्याचयी अट टाकण्यात आली होती.परंतु कंपनीने थातूरमातूर झाडे लावून शासनाची फसवणूक केली असून अटी व शर्तींप्रमाणे वृक्ष लागवड केली नसल्याचा आरोप वडखळ येथील सामाजिक कार्यकर्ते मनोहर विठोबा पाटील यांनी केला आहे. कंपनीने खाडी क्षेत्रातील कांदळवनाचीही मोठी तोड केली असून कंपनीवर गुन्हा दाखल होवूनही असे प्रकार वारंवार होत असल्याचे मनोहर पाटील यांनी सांगितले आहे. मात्र याकडे प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे शासनाने या कंपनीवर कारवाई करावी व डोलवी परिसरात प्रदूषण मापक यंत्र बसवावे अशी मागणी येथील नागरिकांकडून केली जात आहे. प्रदूषण ही नागरिकांची मोठी डोकेदुखी होऊन बसली आहे. या प्रदूषणामुळे डोलवी,आमटेम, पांडापूर, कासू, काराव,नवेगाव, गडब, वडखळ, शहाबाज, या भागातील ग्रामस्थ खूप अस्वस्थ आहेत. हे प्रदूषण कधी संपणार की नाही, असे रहिवाशांचे प्रश्न आहेत. कोटयवधी रुपये कर वसूल करणा-या शासकीय यंत्रणा, ग्रामपंचायती, प्रदूषण नियंत्रणासाठी प्रभावी उपाय योजताना किंवा प्रदुशण कमी करण्यासाठी कंपनीवर दबाब निर्माण करताना दिसत नाहीत. लोकप्रतिनिधींना या सततच्या विषयाचे गांभीर्य राहिले नाही. त्यामुळे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ या प्रदूषणाच्या विषयावर नक्की करते काय असा प्रष्न निर्माण झाला आहे. डोलवी,आमटेम, पांडापूर, कासू, गडब, वडखळ, शहाबाज,या विभागात जेएसडब्ल्यू स्टील लि. कंपनीच्या प्रदूषणाने ग्रामस्थांना त्रास होत आहे. हा कारखाना होण्यापूर्वी हा मोकळा परिसर होता. गर्द झाडांनी भरलेला असल्याने असल्याने त्यावेळी हा विभाग प्रदुशणमुक्त होता. कालांतराने या विभागात कारखाना सुरू झाल्याने घराच्या दारात दररोज खटखट, धूर दिसत असल्याने प्रदूषण हा विषय अधिक प्रमाणात ऐरणीवर आला आहे. जेएसडब्ल्यू कंपनीच्या या भयानक प्रदूषणामुळे या परिसरातील नागरिकांना दमा, खोकला यांसारख्या विविध प्रकारच्या श्वसनाच्या आजारांना सामोरे जावे लागत आहे. कंपनीच्या प्रदूषणामध्ये हवेतून लोहमिश्रीत डस्ट बाहेर पडत असल्याने या परिसरातील भातशेतीवर देखील विपरित परिणाम होऊ लागला आहे. अशा प्रकारे या कंपनीने जनतेच्या जीवनाशी खेळ मांडलेला आहे. तरीदेखील प्रदुषण नियंत्रण मंडळ याकडे दुर्लक्ष का करतेय? असा सवाल परिसरातील ग्रामस्थांमधून उपस्थित केला जात आहे. कंपनीच्या विस्तारित प्रकल्पामुळे तर हे प्रदुषण दुपटीने वाढणार असून त्यामुळे या परिसरातील जनतेला जगणे कठीण होणार आहे. परिणामी शासनाने या कंपनीवर कारवाई करुन येथे प्रदूषण मापक यंत्र बसवावे व नागरिकांना प्रदुषणाच्या विळख्यातून मुक्त करावे अशी मागणी मागणी या परिसरातून जोर धरू लागली आहे

Wednesday, December 6, 2017

Sunday, January 5, 2014

मच्छीमारांना शासनाची नववर्ष भेट ३.२५ लाख जणांना फायदा : यांत्रिक नौकेच्या कर्जासाठी घर गहाण ठेवण्याची गरज नाही ५0 लाख कुटुंबांचा आधार राष्ट्रीय सहकार विकास ्नमहामंडळाकडून मासेमारी नौकांच्या बांधणीसाठी कर्ज घेण्याकरिता आता मच्छीमार बांधवांना त्यांचे घर वा इतर जंगम मालमत्ता गहाण ठेवण्याची गरज नाही. राज्यातील मच्छीमारांच्या कुटुंबातील सदस्य संख्या व आर्थिक परिस्थिती लक्षात घेता राज्य शासनाने नव्या वर्षात हा निर्णय घेतला आहे. शासनाच्या या निर्णयामुळे ठाणे जिल्ह्यातील ७९ हजार ६३५ मच्छीमार बांधवांसह राज्यातील सुमारे तीन लाख २५ हजार मच्छीमारांना मोठा दिलासा मिळणार आहे. यापूर्वी शासन मच्छीमारांना कर्ज देताना हमी म्हणून त्यांचे घर वा जंगम मालमत्तेसह ज्या नौकेच्या यांत्रिकीकरणासाठी कर्ज देण्यात येणार आहे, ती नौकाही गहाण म्हणून ठेवत होते. यामुळे मच्छीमारांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते. ज्या नौकेसाठी आम्ही कर्ज घेतो, तिला मुलांप्रमाणे जपतो. तसेच एका नौकेसाठी सात जणांचा गट असतो. त्या सर्वांना याचा नाहक त्रास होत असल्याने फक्त नौकाच गहाण ठेवावी, अशी आमची मागणी होती. ती नव्या वर्षात सरकारने मान्य केल्याने आम्ही त्याचे स्वागत करतो, असे यासंदर्भात मच्छीमारांचे नेते नरेंद्र पाटील यांनी 'लोकमत'ला सांगितले. राज्यात सागरकिनार्‍यांवर मासळी उतरवण्याची १८४ केंद्रे असून १३,१८१ यांत्रिकी नौका, तर ३,२४२ बिगर यांत्रिकी नौका व १,५५४ ओबीएम कार्यान्वित असून राज्यात भूजल, सागरी, निमखारेपाणी क्षेत्रात १८ ते ६५ वयोगटातील सुमारे ३,२३,८३८ मच्छीमार लोक मासेमारी करीत असल्याची शासनदप्तरी नोंद असली असली, तरी प्रत्यक्षात सुमारे ११ हजार यांत्रिकी नौका व १0 हजार बिगर यांत्रिकी नौका असून, त्यावर मच्छीमारांसह अवलंबून असणारे वाहतूकदार, विक्रेते आणि विविध कच्च्या मालाचा पुरवठा करणारे अशी सुमारे ५0 लाखांहून अधिक कुटुंबे उदरनिर्वाह करीत असल्याचा दावा नरेंद्र पाटील यांनी केला. रफएए-ऊएश्-0709>1/रफएए-ऊएश्-0709>राज्याचे सागरी मत्स्य उत्पादन सरासरी चार लाख ३३ हजार ७८४ मे. टन तर भूजल एक लाख ४५ हजार ७९४ मे. टन आहे. यापैकी एक लाख ५१ हजार मे. टन मासळीची निर्यात होत असून, त्यातून ४,२२९ कोटी १८ लाख रुपयांचे परकीय चलन मिळते. रफएए-ऊएश्-0709> 2/रफएए-ऊएश्-0709>मत्स्यव्यवसाय हा जोखमीचा व्यवसाय आहे. मच्छीमाराचा अपघाती मृत्यू / कायमचे अपंगत्व आल्यास त्यास गटविमा संरक्षण आहे. अपंगत्व आल्यास ५0 हजार व मृत्यू झाल्यास एक लाख रु पये विम्यापोटी दिले जातात. विम्याचा हप्ता अर्धा राज्य शासन व अर्धा केंद्र शासन भरते. त्याचप्रमाणे शासनाच्या मासेमार संकट निवारण निधी योजनेंतर्गत मच्छीमारास अपघातात मृत्यू आल्यास एक लाख इतके अर्थसाहाय्य देण्यात येते. या दोन्ही योजनांद्वारे मच्छीमारास अपघातात मृत्यू आल्यास दोन लाखांची मदत देण्यात येते. रफएए-ऊएश्-0709> 3/रफएए-ऊएश्-0709>नौकांच्या यांत्रिकीकरणासह नायलॉन सूत, मोनोफिलॉमेंट धागा, सुताची जाळी पुरवणे याबरोबरच मासेमारी नौकांवर संदेशवहन, मासळीचा शोध घेण्यासाठी आधुनिक यंत्रसामुग्री खरेदीसाठी शासनाकडून मदत केली जाते. याशिवाय विविध स्तरांवर सुविधा उपलब्ध करण्याचे काम शासन करीत आहे.

Wednesday, August 28, 2013

पी.एन.पी.कंपनीच्या बेकायदेशीर उदयोगांमध्ये आरसीएफ कंपनीचा सहभाग - माजी आमदार मधुशेठ ठाकूर

पी.एन.पी.कंपनीच्या बेकायदेशीर उदयोगांमध्ये आरसीएफ कंपनीचा सहभाग अलिबाग, दि २५ (वार्ताहर) – अलिबागचे कॉंग्रेसचे माजी आमदार मधुशेठ ठाकूर यांनी आज शेकापचे आमदार जयंत पाटील यांच्या मालकीच्या पी.एन.पी.कंपनीच्या बेकायदेशीर उदयोगांमध्ये आर.सी.एफ.कंपनीचाही सहभाग असल्याचा आरोप करून खळबळ उडवुन दिली. पी. एन. पी. कपंनीच्या म्हणण्यानुसार आर. सी. एफ. कंपनीने त्यांची शहाबाज धरमतर येथील बांधकामे पी. एन. पी. कंपनीला वापरण्यासाठी १९९९ मध्ये ना-हरकत दिली होती. मधुकर ठाकूर यांनी आर.सी.एफ.च्या १९९९ मधील नाहरक त प्रमाणपत्राला हरकत घेवून आर.सी.एफ.प्रशासनाला याबाबत फेब्रुवारीमध्येच लेखी विचारणा केली होती. सुरूवातीला आर.सी.एफ.ने सदरची माहिती देण्यास टाळाटाळ केली परंतु या प्रकरणी ठाकूर यांनी थेट केंद्रीय खते व रसायन मंत्रालयास पत्र लिहील्याने वेगाने सुत्रे हलली व आर.सी.एफ.ने १० ऑगस्ट रोजी ठाकूर यांना दिलेल्या लेखी उत्तरामध्ये अशी कोणतीही बांधकामे आर.सी.एफ.ने बांधलेली नव्हती व तशी बांधकामे असल्याबाबतची कोणतीही कागदपत्रे आर.सी.एफ.प्रशासनाकडे उपलब्ध नाहीत असे कबुली दिली आहे. या सर्वावर कहर म्हणजे पी.एन.पी.कंपनीने त्यांचे पत्र दि. २२/११/१९९९ अन्वये ग्रामपंयाचत शहाबाज यांचेकडे अर्ज करून आर.सी.एफ.कंपनीची सन १९८० पासूनची थकबाकी रू. १,६०,०००/- रोख भरीत असल्याचे नमूद करून तशी रोख रक्कम आर.सी.एफ.कंपनीची थकबाकी म्हणून ग्रामपंचायत शहाबाज यांचेकडे भरलीही आहे. तशी पावतीही त्यांनी ग्रामपंचायत शहाबाज यांचेकडून घेतली आहे. ग्रामपंचायत शहाबाज यांच्या दिनांक २८/११/१९९९ च्या ठरावामध्ये आर.सी.एफ.कंपनीच्या दोन दुमजली इमारती, दोन एक मजली इमारती, एक मंदिर, एक पत्रा शेड व एक तळमजला लोडशेडींग अशी बांधकामे असून त्यासाठीचा १९८० पासूनचा कर आकारणी करण्याचा ठराव सर्वानुमते मंजूर केला आहे. मुळात आर.सी.एफ.ने त्यांची कोणतीही बांधकामे नसल्याचे स्पष्टपणे कळविल्यामुळे आर.सी. एफ.ने तात्काळ पी.एन.पी. कंपनीविरूध्द फौजदारी कारवाई सुरू करावी अशी मागणी ठाकूर यांनी आर.सी.एफ.प्रशासनाकडे केली आहे.

Sunday, August 18, 2013

सारळ आरोग्य उपकेंद्राचे माजी आमदार मधुकर ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन. समाजकार्यासाठी तत्पर रहाण्याचा ठाकूरांचा कार्यकत्र्यांना सल्ला 1600 लोकांची मोफत आरोग्य तपासणी

सारळ आरोग्य उपकेंद्राचे माजी आमदार मधुकर ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन. समाजकार्यासाठी तत्पर रहाण्याचा ठाकूरांचा कार्यकत्र्यांना सल्ला अलिबाग 18 आॅगस्ट - सारळ ग्रामपंचायतर्गत सारळ प्राथमिक उपआरोग्य उपकेंद्रांच्या प्रशस्त आणी सुसज्ज इमारतीचे उद्घाटन आज माजी आ. मधुकर ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. यानिमीत्ताने सारळ ग्रामपंचायत व खारेपाट विभाग काॅंग्रेसच्या संयुक्त विदयमाने परिसरातील ग्रामस्थांसाठी मोफत आरोग्य शिबीर आयोजित करण्यांत आले होते. या आरोग्य शिबीरामध्ये 1600 लोकांची मोफत आरोग्य तपासणी करण्यांत आली. जनहितासाठी नेहमी असेच तत्पर रहा असा सल्ला त्यांनी या शिबीरासाठी मेहनत करणा-या खारेपाट विभागातील काॅंग्रेस पदधिका-यांना व कार्यकत्र्यांना दिला. चार हजाराहून अधिक लोकसंख्या असलेल्या सारप ग्रामपंचायतीच्या हद्दीत ग्रामपंचायत कार्यायाशेजारी आरोगय उपकंेद्राची ही इमारत उभी राहीली आहे. विद्यमान ग्रामपंचायत ही काँग्रसच्या ताब्यात असून सरपंच गिरीष पाटील, त्यांचे सहकारी ग्रामपंचायत सदस्य, तालुका युवक काॅंग्र्रेस अध्यक्ष अमित नाईक, तालुका शिक्षकसेल अध्यक्ष जगन्नाथ गोमा पाटील, विभागीय अध्यक्ष वैभव पाटील, जिल्हा सदस्या सरोज डाकी, यांचे ठाकूर यांनी आपल्या भाषणात कौतूक केले. जनेसवा हीच खरी ईश्वर सेवा असल्याने या आरोग्य शिबीराच्या माध्यमातून गोरगरीबांचा आशिर्वाद आपल्याला मिळाला आहे. या आरोग्य शिबीरासाठी जिल्हा शल्य चिकीत्सक सुनील पाटील, जिल्हा आरोगय अधिकारी पाटोळे यांनी त्यांचा कर्मचारी वर्ग निवासी वैदयकीय अधिकारी डाॅ.बडगिरे, डाॅ. वैभव चेवूलकर, डाॅ.तांबे, डॉ. सुरेश म्हात्रे,डॉ. निशीकांत,डॉ. तुषार, डॉ. रवी म्हात्रे, आरोग्य केंद्राचे डॉ जगन्नाथ पाटील, डॉ अजय ठाकूर, डाॅ.संजय, डाॅ.हासमुख राणा व आरोग्य विभागाच्या अनेक अधिपारिचारीका यांच्यासह करून दिल्याबद्दल ठाकूर यांनी या सर्वांचे विशेष आभार मानले. तत्पूर्वी माजी आ. मधुकर ठाकूर यांच्या हस्ते फित कापून व दिपप्रज्वलन करुन इमारतीचे उद्घाटन करण्यात आले याप्रसंगी ग्रामपंचायतीचे सरपंच गिरीश पाटील,, युवक काँग्रेचे तालुुकाध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य अमित नाईक, चंद्रकांत पाटील, जगदिश थळे, विनायक म्हात्रे, शिवानी नाईक, रूषिकेेश नाईक, तंटामुक्तीचे अध्यक्ष अॅड. नितिश पाटील, विष्णू पाटील, तालुका शिक्षकसेल अध्यक्ष जगन्नाथ गोमा पाटील, माजी अध्यक्ष अॅड. अनंत पाटील, हाशिवरे सरपंच विदयाधर ठाकूर, शिवसेनेचे चंद्रकांत पाटील, कृष्णा पाटील, जिल्हा सदस्या सरोज डाकी, हाशिवरे तंटामुक्त अध्यक्ष आदिनाथ पाटील, कमलाकर सांधनकर आदी उपस्थित होते. आरोग्य शिबीरास जनतेचा उत्तम प्रतिसाद मिळाल्याबाबत उपस्थित निवासी वैदयकीय अधिकारी डाॅ.बडगिरें यांनी समाधान व्यक्त करून शासनाचे प्रयत्न सर्वांना आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याचे असून स्थानिक ग्रामपंचायतींनी अशा प्रकारे आरोग्य शिबीरे आयोजित केल्यास आरोग्य विभागामार्फत त्यांना आवश्यक सहकार्य पुरविण्यात येईल असे सांगितले