
Wednesday, August 28, 2013
पी.एन.पी.कंपनीच्या बेकायदेशीर उदयोगांमध्ये आरसीएफ कंपनीचा सहभाग - माजी आमदार मधुशेठ ठाकूर
पी.एन.पी.कंपनीच्या बेकायदेशीर उदयोगांमध्ये आरसीएफ कंपनीचा सहभाग
अलिबाग, दि २५ (वार्ताहर) – अलिबागचे कॉंग्रेसचे माजी आमदार मधुशेठ ठाकूर यांनी आज शेकापचे आमदार जयंत पाटील यांच्या मालकीच्या पी.एन.पी.कंपनीच्या बेकायदेशीर उदयोगांमध्ये आर.सी.एफ.कंपनीचाही सहभाग असल्याचा आरोप करून खळबळ उडवुन दिली. पी. एन. पी. कपंनीच्या म्हणण्यानुसार आर. सी. एफ. कंपनीने त्यांची शहाबाज धरमतर येथील बांधकामे पी. एन. पी. कंपनीला वापरण्यासाठी १९९९ मध्ये ना-हरकत दिली होती. मधुकर ठाकूर यांनी आर.सी.एफ.च्या १९९९ मधील नाहरक त प्रमाणपत्राला हरकत घेवून आर.सी.एफ.प्रशासनाला याबाबत फेब्रुवारीमध्येच लेखी विचारणा केली होती. सुरूवातीला आर.सी.एफ.ने सदरची माहिती देण्यास टाळाटाळ केली परंतु या प्रकरणी ठाकूर यांनी थेट केंद्रीय खते व रसायन मंत्रालयास पत्र लिहील्याने वेगाने सुत्रे हलली व आर.सी.एफ.ने १० ऑगस्ट रोजी ठाकूर यांना दिलेल्या लेखी उत्तरामध्ये अशी कोणतीही बांधकामे आर.सी.एफ.ने बांधलेली नव्हती व तशी बांधकामे असल्याबाबतची कोणतीही कागदपत्रे आर.सी.एफ.प्रशासनाकडे उपलब्ध नाहीत असे कबुली दिली आहे. या सर्वावर कहर म्हणजे पी.एन.पी.कंपनीने त्यांचे पत्र दि. २२/११/१९९९ अन्वये ग्रामपंयाचत शहाबाज यांचेकडे अर्ज करून आर.सी.एफ.कंपनीची सन १९८० पासूनची थकबाकी रू. १,६०,०००/- रोख भरीत असल्याचे नमूद करून तशी रोख रक्कम आर.सी.एफ.कंपनीची थकबाकी म्हणून ग्रामपंचायत शहाबाज यांचेकडे भरलीही आहे. तशी पावतीही त्यांनी ग्रामपंचायत शहाबाज यांचेकडून घेतली आहे. ग्रामपंचायत शहाबाज यांच्या दिनांक २८/११/१९९९ च्या ठरावामध्ये आर.सी.एफ.कंपनीच्या दोन दुमजली इमारती, दोन एक मजली इमारती, एक मंदिर, एक पत्रा शेड व एक तळमजला लोडशेडींग अशी बांधकामे असून त्यासाठीचा १९८० पासूनचा कर आकारणी करण्याचा ठराव सर्वानुमते मंजूर केला आहे. मुळात आर.सी.एफ.ने त्यांची कोणतीही बांधकामे नसल्याचे स्पष्टपणे कळविल्यामुळे आर.सी. एफ.ने तात्काळ पी.एन.पी. कंपनीविरूध्द फौजदारी कारवाई सुरू करावी अशी मागणी ठाकूर यांनी आर.सी.एफ.प्रशासनाकडे केली आहे.

Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment