Wednesday, August 7, 2013

लुटणा-या खाजगी इस्पितळावर अंकुश कोणाचा? जखमी लहानगीच्या उपचारासाठी मजूर दांपत्याच्या हतबलतेनंतर डाॅक्टरांच्या मनमानीचा प्रश्न चर्चेत.

लुटणा-या खाजगी इस्पितळावर अंकुश कोणाचा? जखमी लहानगीच्या उपचारासाठी मजूर दांपत्याच्या हतबलतेनंतर डाॅक्टरांच्या मनमानीचा प्रश्न चर्चेत. अलिबाग - पूर्वी डॉक्टर म्हणजे देव मानला जायचा. परंतु आता ती व्याख्या बदलली आहे. हे देव राहिले नसून लुटमारी करणारे झाले आहेत. अलिबाग शहरामधील खाजगी इस्पीतळे चालविणा-या डाॅक्टरांवर शासनाचा काही अंकुश आहे की नाही असा संतप्त सवाल आता नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे. चोंढी येथील शाळेत इयत्ता 7 वीमध्ये शिकणा-या मनिषा ज्ञानदेव जेठे या लहानगीचा दोन दिवसांपुर्वी शाळेतून घरी येत असताना अपघात झाला. या अपघातामध्ये तिच्या पायास गंभीर दुखापत झाल्याने सुरूवातीला तिला अलिबागमधील एका नामवंत खाजगी रूग्णालयास तपासणीसाठी आणले गेले. या मुुलीची तपासणी केल्यावर डाॅक्टर महाशयांनी आॅपरेशन करावे लागेल व त्यासाठी 18,000/- खर्च यईल तसेच आॅपरेशन लगेच चार ते पाच तासाच्या आत झाले पाहिजे असे सांगितल्यावर मनिषाचे आईवडील अक्षरशः हतबल झाले. कारण ते दोघेही बिगारी काम म्हणजे बांधकाम क्षेत्रातील मजूर असल्याने रोजचा खर्च कसाबसा काढीत असल्याने अठरा हजार आणणार कोठून असा यक्षप्रश्न त्यांचे समोर उभा राहीला. परंतु यावेळी उपस्थित असलेल्या चोंढी शाळेतील शिक्षकांनी माजी आमदार मधुकर ठाकूर यांचेशी संपर्क साधल्यावर ठाकूर यांनी तात्काळ जिल्हा शल्यचिकीत्सक रायगड यांचेशी संपर्क साधून मनिषाला जिल्हा सरकारी रूग्णालयात दाखल करून घेतले गेले. जिल्हा शल्यचिकीत्सक यांनी तात्काळ अस्थितज्ञ डाॅ.विश्वेकर यांना सूचना दिल्या. त्यानंतर या गरीब मुलीच्या पायामध्ये राॅड टाकून यशस्वी शस्त्रक्रीया करून उदया गुरूवारी तिला घरी सोडण्यांत येणार असल्याची माहिती डाॅ.विश्वेकर यांनी दिली आहे. सरकारी रूग्णालयातही या मुलीच्या पायातील राॅडसाठी काही खर्च आला तो या लहागीच्या शाळेतील शिक्षकांनी वर्गणी काढून केला. आपल्या शाळेतील विदयाथर््ीानी आपल्या स्वतःच्या मुलगी असल्याचे मानून शिक्षंकांनी केलेल्या मदतीचे माजी आमदार मधुकर ठाकूर यांनी कौतूक केले अून ‘माणूसकी’ अजून शिल्लक आहे याचे हे मुर्तीमंत उदाहरण असल्याचेही ठाकूर यांनी नमूद केले आहे. या सर्व प्रकरणानंतर मोलमजूरी करणा-या दांपत्याला अठरा हजार फी सांगणा-या इस्पीतळाबाबत सर्वत्र नाराजीचा सुर उमटत आहे. शासनामार्फत खाजगी डाॅक्टर्सना रूग्णालये चालविण्यासाठी ग्रामीण भागासाठी जिल्हा आरोग्य अधिकारी तसेच शहरी भागासाठी जिल्हा शल्य चिकीत्सक यांचे मार्फत परवाने दिले जातात. असे परवाने देताना शासन काही अटी व शर्थी घालते, त्याप्रमाणे इंडियन मेडीकल कौन्सीलच्या प्रोफेशल कंडक्ट रेग्युलेशन 2002 नुसार खाजगी व्यवसाय करणा-या डाॅंक्टर्ससाठी जी शिष्टाचार, नितीतत्वे घालून देण्यांत आलेली आहे त्यामध्ये अशा खाजगी इस्पीतळांनी त्याच्या इस्पीतळात प्राथमिक तपासणी, औषधोपचार, शस्त्रक्रीया आदिंबाबत दर्शनी भागामध्ये फलक लावणे अपेक्षीत असते परंतु कोणत्याही खाजगी रूग्णालयामध्ये याचे पालन केले जात नाही. “जनतेच्या आरोग्याच्या संरक्षणाची मूलभूत जबाबदारी शासनावर आहे त्यामुळे खाजगी डाॅक्टर्सवर आम्ही नियंत्रण ठेवू शकत नाही अशी सबब सांगून त्या जबाबदारीतून कोणाला पळ काढता येणार नाही, खाजगी रूग्णालयांनी त्यांची फी घ्यावी याबाबत वाद नाही परंतु एखादया गोरगरिबावर किमान प्राथमिक उपचार करण्याची माणुसकी तरी त्यांनी दाखविली पाहिजे असे मत मधुकर ठाकूर यांनी व्यक्त केले असून तक्रारी असणा-या खाजगी इस्पीतळांना जिल्हा आरोगय अधिकारी व जिल्हा शल्य चिकीत्सक यंानी वेळीच सुधारा नाहीतर तुमच्या परवान्यांबाबत शासनाला पुर्नविचार करावा लागेल अशा सूचना निर्गमीत होणे आवश्यक असल्याचेही ठाकूर यांनी शेवटी सांगितले.

No comments: