Saturday, August 10, 2013

खानाव ग्रामपंचायतीमध्ये का>ग्रेसची हॅट्ीक ! सरपंचपदी जितेंद्र गोंधळी तर उपसरपंचपदी रूपाली थळे यांची बिनविरोध निवड. अलिबाग.- राजकीय पक्षांनी प्रतिष्ठेची केलेल्या अलिबाग तालुक्यातील खानाव ग्रामपंचायतीवर काॅंग्रेसने निर्विदाद यश मिळविले होते. त्यामुळे अपेक्षीत केल्याप्रमाणे आज झालेल्या सरपंचपदाच्या निवडणूकीत सरपंचपदी काॅंग्रेसचे जितेंद्र अनंत गोंधळी व उपसरपंचपदी रूपाली योगेश थळे यांची बिनविरोध निवड करण्यांत आली. जितेंद्र अनंत गोंधळी व रूपाली योगेश थळे यांचे अनुक्रमे सरपंच व उपसरपंचपदासाठी एकमेव अर्ज दाखल झाल्याने अध्यासी अधिकारी श्रीमती घुगे यांनी दोन्ही उमेदवार बिनविरोध निवडून आल्याचे जाहीर करताच उपस्थित काॅंग्रेस कार्यकत्र्यांनी एकच जल्लोष केला. विजयी उमेदवारांचा सत्कार करण्यासाठी काॅंग्रेस नेते माजी आमदार मधुकर ठाकूर स्वतः जातीने उपस्थित होते. ठाकूर यांन यावेळी बोलताना काॅंग्रेसचे तालुकाध्यक्ष अनंत गोंधळी यांचे विशेष अभिनंदन केले. खानावच्या सर्वच्या सर्व जागा जिंकण्याच्या बाता मारणा-यांचे दात गोंधळींनी त्यांच्याच घशात असे काही घातले आहेत की आता पुन्हा खानावकडे वळून पहाण्याची या बढाईखोरांची हिंमत होणार नाही. खानाव मध्ये भ्रष्टाचार झाल्याच्या बोंबा मारणारे जिल्हा परिषद व पंचायत समिती त्यांच्याकडेच असल्याची सोयिस्कर विसरत असल्याचे जनतेच्या तेव्हाच लक्षात आले होते. त्यामुळे काॅंग्रेसने येथील विकासकामांना दिलेली ही पावती असून आता खानावमध्ये यापेक्षा वेगाने विकासकामे करण्यांत येतील असेही ठाकूर यंानी जाहिर केले. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष म.हि.पाटील, तालुकाध्यक्ष अनंत गोंधळी, निवडणूक प्रभारी योगेश मगर, जिल्हा समिती सदस्या सरोज डाकी, मोनिका पाटील, शहर महिला अध्यक्षा अॅड.श्रध्दा ठाकूर, बामणगांव सरपंच बाळू वरसोलकर, कृष्णा भोपी, श्रीकांत नाईक, प्रभाकर राणे, सुरेश म्हात्रे, अॅड.महेश ठाकूर, इ.उपस्थित होते.

No comments: