Saturday, August 10, 2013

नुकसान शेतक-यांचे, पंचनामे मात्र राजकीय पदाधिका-यांसोबत ! संघर्ष समितीची तहसिलदारंकडे तक्रार. अलिबाग.- रायगड जिल्हयात गेल्या जुलै महिन्यात कोसळलेल्या पावसाने भात शेतीच्या झालेल्या नुकसानीबाबत शासनाच्या महसूल व कृषि खात्याकडून पंचनामे सुरू आहेत. परंतु असे पंचनामे करताना स्थानिक शेतक-यांना सोबत घेण्याऐवजी अधिकारी वर्ग राजकीय पदाधिका-यांना सोबत घेवून फिरत असल्याचे वास्तव उघडकीस आले असून तशा प्रकारची तक्रारच शिवसेना नेते व शेतकरी संघर्ष समितीचे अध्यक्ष नरेश ह. म्हात्रे यांनी अलिबागचे तहलिदार विनोद खिरोळकर यांचेकडे दाखल केली आहे. याबाबत मािहती देताना नरेश म्हात्रे यांनी दि. 6 आॅगष्ट रोजी शहाबाज खाडीपरिसरात महसूल विभागाचे कर्मचारी व कृषि विभगाचे कर्मचारी यांनी शेतीच्या नुकसान भरपाईची पहाणी केली परंतु त्यावेळी एकही शेतकरी त्यांचेसोबत नव्हता तर राजकीय पक्षाचे कार्यकर्ते सोबत घेवून या अधिका-यांनी पंचनाम्याचे सोपस्कार उरकून घेतल्याचा आरोप करतानाच नरेश म्हात्रे यांनी सदरचे पंचनामे रद्द करून गावात दवंडी फीरवून नव्याने पंचनामे करण्यांत यावे अशी मागणी तहसिलदारांकडे केली आहे. भविष्याची तजवीज असलेले उत्पादन वाया गेल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. शहाबाज परिसरात पी.एन.पी सारख्या कंपन्यांनी खारभूमि योजनाच उध्वस्त केल्या असल्याने परिसरात उधाणाचे पाणी घुसल्याने संपूर्ण परिसर जलमय झाला असून भातशेतीचे मोठे नुकसान झाले आहे.अनेक ठिकाणी बांध फुटल्यानं समुद्राचे खारे पाणी जमिनीत घुसून जमिन खारट झाल्याने ती निकामी होण्याची भिती शेतकरी व्यक्त करीत आहेत.अशा गंभीर परिस्थीतीमध्ये नुकसानीचे पंचनामे करताना संबंधित तलाठी , सर्कल , आदी नोकरदार मंडळी जर शेतक-यांना अंधारात ठेवून राजकीय लोकांना सोबत घेवून पंचनामे करणार असतील तर सर्वसामान्य शेतकरी जनतेमध्ये उद्रेक होऊन नोकरशाहीला वठणीवर आणले जाईल असा इशारा संघर्ष समितीच्या वतीने म्हात्रे यांनी दिला आहे

No comments: