Thursday, August 15, 2013

पीएनपी विरोधातील जिल्हाधिकारी यांच्या दुर्लक्षा बाबत मुख्यमंत्र्यांकडे तक्रार दाखल होताच प्रशासनाची उडाली धावपळ!जिल्हाधिकारी यांचे जिल्हा पोलीस अधिक्षक व प्रांत यांना कार्यवाही करण्याचे आदेश प्रशासनाच्या विनंतीवरून संघर्ष समितीने स्वातंत्य्रदिनी होणारे आंदोलन केले 8 दिवसांसाठी स्थगित

पीएनपी विरोधातील जिल्हाधिकारी यांच्या दुर्लक्षा बाबत मुख्यमंत्र्यांकडे तक्रार दाखल होताच प्रशासनाची उडाली धावपळ!जिल्हाधिकारी यांचे जिल्हा पोलीस अधिक्षक व प्रांत यांना कार्यवाही करण्याचे आदेश प्रशासनाच्या विनंतीवरून संघर्ष समितीने स्वातंत्य्रदिनी होणारे आंदोलन केले 8 दिवसांसाठी स्थगित अलिबाग - शेकाप आमदार जयंत पाटील यांच्या पीएनपी कपंनीविरोधामध्ये स्थानिक शेतक-यांच्या संघर्ष समितीच्या लढयास आता चांगलेच बळ मिळाले असून काॅंग्रेसचे आमदार प्रशांत ठाकूर व माजी आमदार मधुकर ठाकूर यांनी रायगडचे जिल्हाधिकारी पी.एन.पी.ला पाठीशी घालत असल्याची तक्रार थेट मुख्यमंत्र्यांकडे केल्याने महसूल विभागात पी.एन.पी.कंपनीविरोधातील तक्रारी एकत्र करून कारवाई करण्यासाठी एकच धावपळ सुरू झाली असून शहाबाज येथील गिम्पेक्स कंपनीच्या बेकायदेशीर काळी माती वाहतुकी बाबत जिल्हाधिकारी यांनीे जिल्हा पोलीस अधिक्षक व प्रांत यांना पत्र लिहून नियमोचीत कार्यवाही करून केलेल्या कार्यवाहीचा अहवाल सादर करण्यांबाबत कळविले असून त्याची प्रत संघर्ष समितीचे अध्यक्ष नरेश म्हात्रे व उपाध्यक्ष व्दारकानाथ पाटील यांना पाठविण्यांत आली आहे. पी.एन.पी.कपंनी विरोधात वर्षाेनोवर्षे स्थानिक शेतकरी तक्ररी करत असूनही जिल्हा प्रशासन ढम्मा राहील्याने शेतक-यांचा संयमाचा बांध फुटला असून शेतकरी सरकारी अधिका-यांची कामे स्वतः करावयास निघाले असल्याने भविष्यात शासन व शेतकरी असा संघर्ष उफाळण्याची शक्यता असल्याने मुख्यमंत्र्यांनी वेळीच हस्तक्षेप करावा अशी विनंती आमदार प्रशांत ठाकूर व माजी आमदार मधुकर ठाकूर यांनी काल (13 आॅगष्ट) मुख्यमंत्र्यांना केली होती. तसेच आता परिस्थीती हाताबाहेर जावू लागली असून आमदारांचे कुटूंबीय आता शेतक-यांना जिवे मारण्याच्या धमक्या देवू लागल्याची बाबही शासनस्तरावरील वरिष्ठांच्या नजरेस आणून दिली गेल्याने प्रशासन तात्काळ सक्रीय झाले. प्रशासनामार्फत संघर्ष समितीच्या सदस्यांना त्यांचे स्वातंत्य्रदिनी होणारे आंदोलन मागे घेण्यासाठी विनंती केली गेली. संघर्ष समितीने प्रशासनाच्या विनंतीस मान देवून जर 8 दिवसांत योग्य कायदेशीर कारवाई झाली नाही तर पुन्हा सदरचे आंदोलन छेडण्यांत येईल या अटीवर स्वातंत्य्रदिनी होणारे आंदोलन स्थगित केले असल्याची माहिती संघर्ष समितीचे अध्यक्ष नरेश म्हात्रे व उपाध्यक्ष व्दारकानाथ पाटील यांनी दिली आहे. आमदार प्रशांत ठाकूर यांनी शहाबाज संघर्ष समिती, मु.पो.शहाबाज, ता.अलिबाग यांच्या निवदेनाच्या प्रती मुख्यमंत्र्यांकडे सादर करून पी.एन.पी.कंपनी शहाबाज यांनी शहाबाज परिसरात बेसुमार कांदळवन तोड करणे, शेतक-यांच्या जमिनी हडप करणे, सरकारी जमिनी हडप करणे, बेकायदेशीररित्या कोळसा, गंधक, सिमेंट उतरविणे, त्यामुळे शेतक-यांचे जमिनींचे नुकसान होणे, खारभूमी योजना गिळंकृत करणे, नैसर्गिक नाले बुजविणे, अनधिकृत इमारती बांधणे, अनधिकृत जेट्टया बाध्ंाणे, राज्य शासनाची परवानगी न घ्रेता बांधकाम विभागाच्या रस्त्यावरून रेल्वे रूळ टाकणे, बनावट सरकारी कागदपत्रे व सराकारी शिक्के बनविणे या बाबत संघर्ष समितीने तसेच माजी विधानसभा सदस्य मा.मधुकर ठाकूर यांनी वारंवार जिल्हाधिकारी व संबधीत शासकीय विभागांकडे तक्रारी केलेल्या आहेत. परंतु जिल्हाधिकारी रायगड हे जाणीवपुर्वक पी.एन.पी.कंपनीस पाठीशी घालीत असल्याची शहाबाज संघर्ष समितीची तक्रार असल्याचे मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले असून शेतक-यांच्या हितार्थ या विषयाबाबत तात्काळ चैकशीचे आदेश पारीत करण्याची विंनती मुख्यमंत्र्यांना केली आहे.

No comments: