Tuesday, August 6, 2013

http://navshakti.co.in/raigad-konkan/129545/ मुरूडच्या जनतेला वेठीस धराल तर खबरदार! मुरुड-जंजिरा, दि. 31 - हिंदुस्थान पेट्रोलियम कंपनीने सुरक्षिततेच्या नियमांचा बागुलबुवा करून गेल्या अनेक वर्षांपासून मुरूड तालुका सुपारी खरेदी विक्री संघाच्या सुधा गॅस एजन्सीकडे मुरूड तालुक्यांतील गॅस सिलिंडर वितरणचे जे काम अलिबागच्या रायगड बाजारकडे दिले आहे ते त्वरित मुरूड तालुका सुपारी खरेदी विक्री संघाच्या सुधा गॅस एजन्सी मुरूडकडे पूर्ववत सुपूर्द करण्यांत यावे अशी मागणी काँग्रेसचे माजी आमदार मधुकर ठाकूर यांनी कोकण विभागीय आयुक्तांकडे केली आहे. आयुक्तांकडे केलेल्या मागणीची माहिती देण्यासाठी ठाकूर यांनी आज जिल्हा पुरवठा अधिकारी किरण पाणबुडे यांची जिल्हाधिकारी कार्यालयात भेट घेतली. पुरवठा अधिकार्यांची चर्चा करताना ठाकूर यांनी मुरूडकरांच्या वतीने बाजू मांडताना, मुळात ज्या सुरक्षिततेच्या कारणावरून एच.पी.कंपनीने सुधा गॅस एजन्सीचे गॅस सिलींडर वितरणाचे काम काढून घेऊन अलिबाग येथील रायगड बाजार या संस्थेकडे वर्ग करण्याचा निर्णयच संशयास्पद व राजकीय नेत्यांच्या फायद्यासाठी घेतल्याचे स्पष्ट होत असल्याचे ठाकूर यांनी आयुतांना लिहिलेल्या पत्रात नमूद केले असून त्याचे कारण विषद करताना ठाकूर यानी केंद्र सरकारने अलीकडेच गॅस सिलेंडर पेट्लो पंपावर विकण्याची घोषणा केली असल्याकडे लक्ष वेधले असून जर पेट्लो पंपावर गॅस सिलेंडर सरकार खुलेपणाने विकणार असेल तर मुरूड येथील गोडावून बंदिस्त असूनही एच.पी.कपंनी सुरक्षिततेचे कारण देऊन मुरूड तालुक्यातील लोकांना 50 कि.मी.वरील अलिबाग येथून सिलेंडर आणण्याची सक्ती करत आहे. हे अनाकलनीय असल्याचे ठाकूर यांनी पुरवठा अधिकार्यांना सांगितले. याच पत्रात ठाकूर यांनी रायगड बाजार ही संस्था शेकाप आमदार जयंत पाटील कुटुंबीय संचलित संस्था असल्याने मुरूड तालुक्यांतील 10229 घरगुती तर 127 व्यापारी कनेक्शनधारक या संस्थेकडे देण्याचा घाट या आमदारव्दयींनी एच.पी.कंपनीच्या संगनमताने घातला असल्याचा खळबळजनक आरोप ठाकूर यांनी त्यांच्या नेहमीच्या रोखठोक शैलीत केला आहे. त्याचप्रमाणे गॅस सिलेंडर पेट्लो पंपावर विकण्याचा केंद्र शासनाचा निर्णय लोकहितकारी असा आहे व या निर्णयामुळेच एच.पी.कंपनीने सुधा गॅस एजन्सीचे वितरणाचे अधिकार काढून घेण्याचा निर्णय मलाही एकतर्फी वाटत असल्याचे ठाकूर यांनी नमूद केले आहे. कंपनीच्या या एकतर्फी निर्णयामुळे मुरूड तालुक्यांतील गॅस ग्राहकांची मोठीच कुचंबणा होत असून सामान्य मजूर, गृहिणी, ज्येष्ठ मंडळींना सिलेंडर मिळविण्यासाठी अक्षरशः कसरत करावी लागत आहे. गॅस सिलेंडर मिळविण्यासाठी मुरुड तालुक्यांत एच. पी. ग्राहकांना अनेक अडचणींसह भुर्दंडही भरावा लागत आहे. या गलथान कारभाराबाबत नागरिकांतून तीव्र असंतोष व संतापाची लाट उसळली असून यावर शासनाने वेळीच हस्तक्षेप करून योग्य उपाययोजना न केल्यास जनप्रक्षोभ उसळण्याची चिन्हे दिसत असल्याबाबत ठाकूर यांनी शासनाला सावध केले आहे.

No comments: